लंडन – जशी पृथ्वीवर जीवसृष्टी आहे, त्याप्रमाणे परग्रहांवरही जीवसृष्टी असून तेथे एलियन्स (एलियन्स म्हणजे परग्रहावरील प्राणी किंवा जीव) वावरत असल्याचे दावे अनेक वेळा शास्त्रज्ञांकडून केले जातात. या पार्श्वभूमीवर एलियन्स कुठल्या ग्रहावर वास्तव्य करतात, हे शोधण्यात शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे.
ब्रिटीश शास्त्रज्ञांना ‘के २-१८ बी’ नावाच्या ग्रहाचा शोध लागला आहे. या ग्रहावर जीवसृष्टी असल्याचे अनेक संकेत मिळाले आहेत, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीवरून ब्रिटीश वृत्तपत्र ‘द सन’ने ही माहिती दिली आहे. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हा ग्रह पृथ्वीपासून १२० प्रकाशवर्षे लांब आहे, तसेच तो पृथ्वीच्या आकारापेक्षा अडीच पट मोठा आहे.

या ग्रहाविषयी अभ्यास करणार्या शास्त्रज्ञांचे नेतृत्व भारतीय वंशाचे ब्रिटीश शास्त्रज्ञ प्रा. डॉ. निक्कू मधुसूदन करत आहेत. ‘हा ग्रह महासागरांनी व्यापलेला असल्याची शक्यता आहे’, असे डॉ. मधुसूदन यांनी म्हटले आहे.
संपादकीय भूमिका‘अनंतकोटी ब्रह्मांडे आहेत’ असे हिंदु धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे. त्याचा शोध आता विज्ञानाला लागत आहे ! |