
बेळगाव, १७ एप्रिल (वार्ता.) – ‘हलाल’ ही इस्लामी संकल्पना ‘सेक्युलर’ (निधर्मी) म्हणवणार्या भारतातील बहुसंख्य ७८ टक्के हिंदूंवर थोपवली जात आहे. भारतात शासनाचे ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (FSSAI), तसेच ‘अन्न व औषध प्रशासन’ (FDA) हे विभाग असतांना ‘जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’सारख्या खासगी मुसलमान संस्था भारतीय उत्पादकांकडून सहस्रो रुपये घेऊन ‘हलाल प्रमाणपत्र’ देत आहेत. ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या माध्यमातून गोळा होणारा पैसा हा आतंकवादासाठी वापरला जात आहे. त्यामुळे व्यापार्यांनी ‘हलाल’च्या उत्पनावर बहिष्कार टाकून देशहितार्थ हा पैसा वाचवावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी केले. ते पाटीदार समाजाच्या वतीने उद्योजक आणि व्यापारी यांच्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमात श्री. सुनील घनवट यांनी उपस्थितांना ‘हलाल सर्टिफिकेशन’विषयी सविस्तर माहिती देऊन त्याच्या परिणामांविषयी अवगत केले. या प्रसंगी श्री. सुनील घनवट यांनी ‘लव्ह जिहाद’ची भयावहता कशा प्रकारे वाढत आहे, शहरी नक्षलवाद, ‘जे.एन्.यु.’सारखी विद्यापिठे कशाप्रकारे पुरोगाम्यांचे अड्डे झाले असून त्याद्वारे समाजाची दिशाभूल कशी केली जाते हे सोदाहरण समजावून सांगितले. याचा लाभ १०० हून अधिक उद्योजक, व्यापारी यांनी घेतला. या प्रसंगी मगनभाई पटेल, महेंद्रभाई पटेल, बाबूभाई पटेल, मगनकाका पटेल, रतनशी पटेल उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यावर श्री. सुनील घनवट यांनी संचालक मंडळास १७ ते १९ मे या कालावधीत फोंडा, गोवा येथे होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’स उपस्थित रहाण्याचे निमंत्रण दिले.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !