मुलुंड येथील अनधिकृत मशीद आणि भोंगे यांच्या विरोधात आज पोलीस ठाण्यासमोर आंदोलन !

किरीट सोमैया

मुंबई, १७ एप्रिल (वार्ता.) – मुलुंड येथील अधिकृत आणि अनधिकृत मशिदी, तसेच मशिदींवरील भोंग्यांसंबंधी माहिती घेण्यासाठी पोलीस अधिकार्‍यांसमवेत ५ मशिदींना भेट दिली आहे. यामध्ये २ ठिकाणी अनधिकृत मशिदी उभ्या रहात असल्याचे निदर्शनास आले आहे. मुलुंड (प.) येथील जलाराम मार्केटच्या मागे अशाच पद्धतीने ‘लँड जिहाद’द्वारे अनधिकृत मशीद बांधून अनधिकृत भोंगेही लावण्यात आले आहेत. पोलिसांना हे सर्व मी दाखवून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या वेळी मनीष तिवारी, नील सोमैया, विनोद कांबळे, सरोज झा, प्रकाश मोटे, दलजीत मान आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांचा गोंगाट, नाहक त्रासाच्या विरोधात १८ एप्रिल या दिवशी दुपारी १२ वाजता मुलुंड (प.) पोलीस ठाण्यासमोर भाजप कार्यकर्त्यांसमवेत आंदोलन करणार आहे, अशी माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी दिली.