
कारागृहात क्षमतेच्या तीनपट अधिक बंदीवान !

मुंबई – मुंबई मध्यवर्ती कारागृहात ९९९ बंदीवान राहू शकतात; मात्र सध्या येथे ३ सहस्र ३६१ बंदीवानांना ठेवण्यात आले आहे. पुरेशी जागा आणि सोयी-सुविधांअभावी कारागृहात शिक्षा भोगणार्यांना अडचणी येत आहेत. या समस्येची राज्य मानवाधिकार आयोगानेही गंभीर नोंद घेतली असून महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका : कारागृह प्रशासनाचा भोंगळ कारभार !
‘डिजिटल रक्षक’ साहाय्य क्रमांक घोषित

मुंबई – सायबर फसवणूक झालेल्या व्यक्तीला दूरभाष किंवा व्हॉट्सॲप यांच्या माध्यमातून पोलिसांशी संपर्क साधता येण्यासाठी ‘डिजिटल रक्षक’ साहाय्य क्रमांक चालू करण्यात आले आहेत. याद्वारे पीडित व्यक्तीचे समुपदेशन करून तिला साहाय्य करण्यात येईल. सायबर फसवणुकीपासून वाचण्यसाठीही नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी मुंबई पोलिसांनी ७७१५००४४४४, ७४०००८६६६६ हे क्रमांक उपलब्ध केले आहेत.
अनधिकृत शाळांची सूची घोषित !

अंबरनाथ (जिल्हा ठाणे) – अंबरनाथ पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने तालुक्यातील ६ अनधिकृत शाळांची सूची घोषित केली आहे. वर्ग भरवण्यासाठी शासनाची मान्यता मिळाली नसल्याने या शाळांना अनधिकृत म्हणून घोषित करण्यात आले. या शाळांमध्ये पालकांनी त्यांच्या पाल्यांसाठी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
संपादकीय भूमिका : अनधिकृत शाळा नंतर बंद करण्यापेक्षा त्या उभारल्याच जाऊ नयेत, यासाठी प्रयत्न करून विद्यार्थ्यांची होणारी शैक्षणिक हानी रोखावी !
बिबट्याच्या आक्रमणात चिमुकलीचा मृत्यू !

जळगाव – येथील डांभुर्णी शिवारातील शेतात मेंढपाळ कुटुंब वास्तव्यास आहे. १६ एप्रिलच्या मध्यरात्री सर्वजण झोपलेले असतांना बिबट्याने झडप घालून २ वर्षांच्या रत्ना या मुलीला उचलले आणि तिला घेऊन तो अंधारात पसार झाला. रत्नाच्या आईने आरडाओरड केल्यानंतर मेंढपाळांनी शोध घेतला. काही अंतरावरच त्यांना शरिराचे लचके तोडलेल्या अवस्थेतील रत्नाचा मृतदेह आढळला. बिबट्याला जेरबंद करण्याची कार्यवाही वनविभाग करत आहे.
मुंबईत जास्त पाऊस पडणार !

मुंबई – मुंबईत यंदा जास्त म्हणजेच ६५ टक्के पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. चांगला पाऊस पडला, तर मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार नाही.
शालार्थ आयडी मान्यतेसाठी अधिकार्यांना १५ दिवसांची मुदत !
छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर अत्याचार करणार्या शिक्षकाला अटक !
गुटखा तस्करांवर थेट ‘मकोका’: मुख्य सूत्रधारांचे नेटवर्क उद्ध्वस्त करणार !
देवस्थान इनाम निर्मूलन कायदा रहित होईपर्यंत लढा चालू ठेवावा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !