पिंपरी (पुणे) येथे ३० सहस्र रुपयांची लाच घेतांना पोलीस उपनिरीक्षकास अटक

भ्रष्टाचाराने पोखरलेली महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणा !

प्रतिकात्मक छायाचित्र

पिंपरी (पुणे) – नोंदवलेल्या गुन्ह्यात साहाय्य करण्यासाठी, गुन्ह्यात कह्यात घेतलेले वाहन सोडवण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक यांनी ३० सहस्र रुपयांची लाच मागितली. ती घेत असतांना बोकेफोडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई पिंपरी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या मोहननगर पोलीस चौकी येथे १५ एप्रिल या दिवशी करण्यात आली. या प्रकरणी २४ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्रविष्ट केली होती.