दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : दक्षिण मुंबईत सव्वा दोन कोटी रुपयांची रक्कम जप्त !; सत्ताधार्‍यांकडून कोट्यवधींच्या उधळपट्टीचा आरोप !…

मुंबई पोलिसांनी दक्षिण मुंबईतील व्यवसायिकाच्या ठिकाणी केलेल्या कारवाईत सव्वा दोन कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. ही रक्कम प्राप्तीकर विभागाच्या अधिकार्‍यांच्या कह्यात देण्यात आली आहे.

लाच स्वीकारतांना साहाय्यक फौजदार आणि ‘ट्रॅफिक वॉर्डन’ यांच्यावर गुन्हा नोेंद !

पोलीस खात्यातील तळागाळापर्यंत मुरलेला भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी कठोर शिक्षा हाच एकमेव पर्याय !

आदिवासी सवलतींचा लाभ घेणार्‍या आयटीआयमधील धर्मांतरित विद्यार्थ्यांवर कारवाई होणार !

शिक्षणक्षेत्रात अन्य ठिकाणी असे होत नाही ना ? याचीही चौकशी व्हायला हवी !

‘Vande Bharat’ Ridiculous Instructions : ‘वन्दे भारत’ रेल्वेमध्ये हिंदी आणि मराठी भाषांतील एकत्रित हास्यास्पद सूचना !

सर्वसुविधांनी युक्त आणि अत्याधुनिक यंत्रणांचा उपयोग करण्यात आलेल्या ‘वन्दे भारत’ रेल्वेमधील डब्यांमध्ये प्रवाशांसाठी असलेल्या सूचनांमध्ये मात्र शब्दांच्या असंख्य चुका !

चिखली (पिंपरी) येथील २ वर्षांच्या बालकाच्या मृत्यूप्रकरणी ३ आधुनिक वैद्यांसह २ परिचारिकांवर गुन्हा नोंद !

२ वर्षांच्या मुलाच्या पायाजवळ ‘वॉर्मर मशीन’ ठेवल्याने गुडघ्याखालील पाय जळल्याने दिरांश गादेवार या बालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी चिखली येथील खासगी रुग्णालयातील ३ आधुनिक वैद्यांसह २ परिचारिकांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दादरच्या बाजारपेठेतील कचर्‍याच्या स्वच्छतेसाठी कर्मचार्‍यांना काही घंटे राबावे लागते !

मुंबईत स्वच्छतेची ऐशी कि तैशी !

Delhi HC On Chhath Puja : प्रदूषित यमुना नदीच्या काठावर छठपूजा करण्याची अनुमती देता येणार नाही !

हिंदु धर्मानुसार नद्यांना आध्यात्मिक महत्त्व असल्याने आता या नद्यांच्या शुद्धतेसह पावित्र्यही प्रदूषणामुळे नष्ट करण्यात आले आहे. हे हिंदूंनाही तितकेच लज्जास्पद आहे !

पाळधी (जळगाव) ते शेगाव दिंडीत भजन म्हणणे, वाद्य वाजवणे याला पोलिसांचा विरोध !

हिंदूंना सुरक्षितपणे, तसेच मोठ्या उत्साहात दिंडी काढता यावी, यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

नालासोपार्‍यात तिकीट तपासनीसाचा उद्दामपणा आणि अरेरावी !

मराठीला अभिजात (उच्च) भाषेचा दर्जा मिळाल्यावरही होणारा मराठीद्वेष दुर्दैवी ! अशांना बडतर्फच करायला हवे !

दिवाळीत झाली खासगी ट्रॅव्हल्स तिकिटांची ‘रेड बस’ॲपवर चढ्या दराने विक्री !

हिंदूंच्या सणांच्या काळात बेसुमार भाडेवाढ करणार्‍या खासगी टॅव्हल्सवर कारवाई होणार कि नाही ?