‘सनबर्न’च्या आयोजकांना दणका : सुरक्षा ठेव रक्कम जप्त करण्यास राष्ट्रीय हरित लवादाची मान्यता
गोव्यात वर्ष २०२२ मध्ये ‘सनबर्न म्युझिक फेस्टीव्हल’ झाले होते. या वेळी ‘सनबर्न’मध्ये ध्वनीप्रदूषण झाल्याच्या कारणास्तव गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयोजकांची १० लक्ष रुपयांची सुरक्षा ठेव रक्कम जप्त करण्याचा आदेश दिला होता.