पुणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर १ मासापासून देयक मिळण्यासाठी वडील आणि मुलगा यांचे उपोषण !

१ मास होऊनही महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर उपोषण करणार्‍यांची नोंद घेतली न जाणे, हे प्रशासनाला लज्जास्पद आहे !

पालघर जिल्ह्यात भटके कुत्रे आणि अन्य प्राणी चावल्याने नागरिक पुष्कळ त्रस्त !

ठेका देऊनही प्राण्यांचे निर्बिजीकरण न झाल्याने नागरिकांना त्रास होतो, हे प्रशासनासाठी लज्जास्पद !

सार्वजनिक शौचालयाच्या गटारात पडून २ जणांचा मृत्यू, १ गंभीर घायाळ !

मालाड मालवणी येथे एका सार्वजनिक शौचालयाच्या गटारात ३ तरुण पडल्याची घटना २१ मार्च या दिवशी संध्याकाळी घडली. मालवणी गेट क्रमांक ८ येथे घडलेल्या या घटनेतील दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात १९ अध्यासनांपैकी १२ अध्यासनांना प्रमुख नसल्याची माहिती उघड !

शिक्षणाच्या संदर्भात अशी उदासीनता असणे गंभीर आहे !

Panjim SmartCity Pollution : पणजीतील ‘स्मार्ट सिटी’च्या कामांमुळे धुळीचे प्रदूषण : उच्च न्यायालयात २ याचिका प्रविष्ट !

गोवा सरकार, ‘इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन’ आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले असून त्यांना योग्य आदेश द्यावेत, अशी मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली आहे.

एम्.ए.च्या प्रथम वर्षाच्या शिक्षणशास्त्र विषयातील एका पेपरचा निकाल १ वर्षानंतरही नाही !

शिक्षण विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना काढेल का ?

पुणे येथील ससूनच्या अधिकार्‍याच्या विरोधात राज्य माहिती आयोगाची शिस्तभंगाची कारवाई !

माहिती लपवणे आणि खोटी माहिती पुरवल्याचे प्रकरण !

आळंदी (पुणे) येथील ज्ञानेश्वर माऊलींच्या ‘सिद्धबेटा’तील सभागृहाची दुरवस्था !

सिद्धबेट येथे ‘राज्य तीर्थक्षेत्र विकास आराखड्या’तून लाखो रुपये व्यय करून वारकर्‍यांसाठी सभागृह बांधण्यात आले आहे; परंतु त्याचा वापर होत नसल्याने सर्वत्र अस्वच्छता, कचरा, धूळ, तसेच मद्याच्या रिकाम्या बाटल्याही येथे आढळल्या.या सभागृहाकडे आळंदी नगर परिषदेचेही दुर्लक्ष होत आहे.

Goa Dance Bars : कळंगुट येथे ‘डान्सबार’ बंद : ‘मसाज पार्लर’ चालू !

डान्सबारच्या चालकांनीच चालू केले अनधिकृत मसाज पार्लर असे मसाज पार्लर चालू होईपर्यंत पोलीस आणि प्रशासन झोपले होते का ?

जळगाव येथे गोरक्षक संजय शर्मा यांचे पोलिसांच्या अन्याय्य वागणुकीच्या निषेधार्थ शिवतीर्थ येथे उपोषण !

गोरक्षकांची तळमळ आणि संघर्ष समजून न घेता अनधिकृत पशूवधगृहांवर कारवाई करण्याऐवजी गोरक्षकांनाच त्रास देणारे प्रशासन पापाचे भागीदार होईल, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?