‘यज्ञाचा सकारात्मक परिणाम सभोवतालच्या वातावरणावर होतो’, हे सर्वश्रुत आहे. महर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वर्ष २०१८ पासून अनेक यज्ञयाग करण्यात आले. या यज्ञयागांच्या संदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने विपुल संशोधन केले आहे. या संशोधनातून ‘यज्ञयाग केल्याने यज्ञकुंड, यज्ञाचे यजमान अन् पुरोहित, यज्ञातील विविध घटक, तसेच सभोवतालचे वातावरण यांवर पुष्कळ सकारात्मक परिणाम होतो’, हे सिद्ध झाले आहे.
भाजपचे पदाधिकारी गोवा येथील आध्यात्मिक संशोधन केंद्राला विद्यार्थ्यांसह भेट देणार !
हिमाचल प्रदेशातील शिमला येथील भाजपचे पदाधिकारी श्री. रवीकुमार मेहता यांनी त्यांच्या उच्च न्यायालयाच्या राकेश शर्मा या न्यायाधीश मित्रासह महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या प्रदर्शनाला भेट दिली. त्यांनी प्रदर्शन पाहून सांगितले की, कुणा अज्ञात शक्तीने प्रदर्शनस्थळी त्यांना खेचून आणले.