प्रयागराज कुंभपर्व २०२५
प्रयागराज, २६ जानेवारी (वार्ता.) : मी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे प्रदर्शनाचे अवलोकन केले. मला हे प्रदर्शन या कुंभनगरीतील अन्य प्रदर्शनांपेक्षा वेगळेच जाणवले. मी असे प्रदर्शन पाहिले नाही.
येथे दैनंदिन जीवनासह आपल्या १४ विद्या आणि ६४ कला यांमध्ये आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव कसा घ्यायचा ? हे या ठिकाणी शिकायला मिळाले. यामुळे स्वत:चे वैयक्तिक उत्थान होऊ शकेल, असे उद्गार हे प्रदर्शन पाहून हृषिकेश येथील सुप्रसिद्ध गीताभवनचे श्री. गौरीशंकर मोहता यांनी काढले. कुंभनगरीत सेक्टर क्रमांक ७ येथे हे प्रदर्शन लावले आहे.

श्री. गौरीशंकर मोहता पुढे म्हणाले की,
स्वस्तिक चिन्हाविषयी चांगले संशोधन आहे. योग्य चिन्ह काढून ऊर्जा कशा प्रकारे मिळू शकेल, हे समजावले आहे. अयोग्य प्रकारे लिहिलेली अक्षरांचा नकारात्मक परिणाम, चांगल्या पद्धतीने लिहिलेल्या अक्षरांचा सकारात्मक परिणाम हे शास्त्रीय पद्धतीने दाखवले आहे.
त्याचप्रमाणे अलंकार, केसांची रचना यांचा अध्यात्माशी जोडून दाखवलेला संबंध भावला. हा सर्व नवीन प्रयोग आहे आणि ते पाहून चांगले वाटले.