अवघ्या ३ मासांत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील मूर्ती आणि चित्रे यांच्या चैतन्यात विलक्षण वाढ होणे

पूजेतील अन्य वस्तू उदा. घंटा, शंख आदी यांच्यातील चैतन्यात पुष्कळ वाढ झाली आहे. यातून ‘काळानुरूप आणि कार्यानुरूप विविध देवीदेवतांची तत्त्वे पुष्कळ प्रमाणात कार्यरत झाली आहेत’, असे लक्षात येते.

कुंभक्षेत्रात महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाचा प्रदर्शनकक्ष बनला जिज्ञासूंचे विशेष आकर्षण !

ओडिशा येथील सौ. अनुसया स्‍वैन यांनी कक्षातील फलकांची माहिती सांगणार्‍यांचा व्‍हिडिओ सिद्ध केला. ‘तो व्‍हिडिओ घरी सर्वांना दाखवणार’, असे त्‍यांनी सांगितले.

महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या प्रदर्शनाला भेट देणार्‍या भाविकांनी दिल्‍या उत्‍स्‍फूर्त घोषणा !

गोरखपूर येथून आलेल्‍या भाविकांच्‍या एका समुहाने येथील महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या कक्षाला भेट दिली. त्‍यांनी कक्षातील सर्व फलकांची माहिती घेतली…

महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या प्रदर्शनाला प्रसारमाध्‍यमांचा लाभत असलेला प्रतिसाद !

‘तिलक वायटी’ या ३६ लाख अनुयायी असलेल्‍या वाहिनीने महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या कु. ज्‍योत्‍स्ना गांधी यांची २५ मिनिटे मुलाखत घेतली. या वेळी सूत्रसंचालकाने प्रदर्शनात लावलेल्‍या फलकांविषयी जाणून घेतले आणि ‘पुन्‍हा एकदा मुलाखतीसाठी नक्‍की येईन’, असे सांगितले. 

Aaroh Srivastava : महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या समवेत कार्य करू !

उज्जैन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या वैदिक घड्याळाच्या प्रचारार्थ श्री. आरोह श्रीवास्तव हे कुंभ येथे आले होते. त्यांनी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या प्रदर्शनकक्षाला भेट दिल्यानंतर कक्षात लावलेल्या वैज्ञानिक उपकरणांद्वारे केल्या गेलेल्या परीक्षणाची माहिती त्यांना पुष्कळ आवडली.

संगीत साधनेतून ईश्वरप्राप्ती करण्याची तळमळ असलेले पलवल, हरियाणा येथील गायक श्री. प्रदीप चौहान !

आपण आपल्या मनाला वाटेल तसा विचार करतो आणि तसे वागतो; मात्र ‘गुरूंना आपल्यासाठी कुठला मार्ग आवश्यक आहे’, हे सर्व ठाऊक असते. आपल्याला सूक्ष्म स्तरावरील अनुभवायचे असल्यास त्यासाठी गुरुकृपाच हवी.

उत्तरप्रदेशचे माजी राज्यमंत्री उत्पल राय यांची महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या प्रदर्शनाला भेट !

उत्तरप्रदेशचे माजी मंत्री आणि भाजपचे श्री. उत्पल राय यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या प्रदर्शनाला सदिच्छा भेट दिली. या वेळी विश्वविद्यालयाचे श्री. कृष्णा मांडवा यांनी श्री. राय यांना प्रदर्शन दाखवले आणि श्री. राय यांनी विश्वविद्यालयाचे कार्य जाणून घेतले.

भाजपचे पदाधिकारी गोवा येथील आध्यात्मिक संशोधन केंद्राला विद्यार्थ्यांसह भेट देणार !

हिमाचल प्रदेशातील शिमला येथील भाजपचे पदाधिकारी श्री. रवीकुमार मेहता यांनी त्यांच्या उच्च न्यायालयाच्या राकेश शर्मा या न्यायाधीश मित्रासह महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या प्रदर्शनाला भेट दिली. त्यांनी प्रदर्शन पाहून सांगितले की, कुणा अज्ञात शक्तीने प्रदर्शनस्थळी त्यांना खेचून आणले.

छत्तीसगड येथील शदानी दरबारचे पू. युधिष्ठिरलाल यांची महाकुंभक्षेत्री असलेल्या महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या प्रदर्शनाला भेट

कलाकुंभाच्या समोरील बाजूस सेक्टर क्रमांक ७ येथे हे प्रदर्शन आहे. या वेळी पू. युधिष्ठिरलाल यांच्या समवेत त्यांचे भक्तही उपस्थित होते.

महाकुंभमेळ्यात पहिल्यांदाच अध्यात्मात संशोधन करणार्‍या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा प्रदर्शन कक्ष !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा प्रदर्शन कक्ष या वर्षी कुंभमेळ्यामध्ये पहिल्यांदाच उभारण्यात आला आहे. मुख्य म्हणजे या प्रदर्शनाची माहिती घेण्यासाठी अनेक पत्रकार स्वतः भेट देऊन कार्य जाणून घेत आहेत.