महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या प्रदर्शनाचा परिणाम !

प्रयागराज (उत्तरप्रदेश), २९ जानेवारी (वार्ता.) – हिमाचल प्रदेशातील शिमला येथील भाजपचे पदाधिकारी श्री. रवीकुमार मेहता यांनी त्यांच्या उच्च न्यायालयाच्या राकेश शर्मा या न्यायाधीश मित्रासह महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या प्रदर्शनाला भेट दिली. त्यांनी प्रदर्शन पाहून सांगितले की, कुणा अज्ञात शक्तीने प्रदर्शनस्थळी त्यांना खेचून आणले. त्यांनी प्रदर्शनकक्षातील सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या प्रतिमेला भावपूर्ण नमस्कार केला. श्री. मेहता स्वत: एक शाळा चालवतात. ते शिक्षक आणि विद्यार्थी यांचा ७० ते ७५ जणांचा गट घेऊन गोवा येथे शैक्षणिक सहलीसाठी येणार आहेत. ‘गोव्यातील तुमच्या आध्यात्मिक संशोधन केंद्रात विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन शिकता येईल, या दृष्टीने काही तासांसाठी त्यांना आणीन’, असेही ते या वेळी म्हणाले. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या भेटीच्या वेळी ‘मुलांना साधनेविषयी सांगा’, अशी विनंतीही त्यांनी या वेळी केली.