श्री तुळजाभवानी मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेऊ ! – डॉ. सचिन ओंबासे, जिल्हाधिकारी, धाराशिव

जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांना निवेदन देतांना मंदिर महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते

तुळजापूर – श्री तुळजाभवानी मंदिरात वस्त्रसंहिता (मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली) लागू करावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी तथा मंदिराचे अध्यक्ष डॉ. सचिन ओंबासे यांना देण्यात आले होते. या संदर्भात कायदेशीर आणि धार्मिक गोष्टींचा अभ्यास करून निर्णय घेऊ, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले आहे. या प्रसंगी तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. किशोर गंगणे, अधिवक्ता शिरीष कुलकर्णी आणि मंदिर महासंघाचे श्री. विनोद रसाळ उपस्थित होते.