ठाणे येथे महाराष्‍ट्र मंदिर महासंघाच्‍या वतीने मंदिर विश्‍वस्‍त आणि पुजारी यांची बैठक पार पडली !

ठाणे, २ फेब्रुवारी (वार्ता.) – येथे महाराष्‍ट्र्र मंदिर महासंघ यांच्‍या वतीने २५ जानेवारीला वर्तकनगर येथील श्री साईनाथ सेवा समितीच्‍या सभागृहात मंदिर विश्‍वस्‍त आणि पुजारी यांची बैठक झाली. या बैठकीला १७ मंदिरांचे विश्‍वस्‍त आणि कार्यकारी मंडळातील सदस्‍य असे मिळून २९ जण उपस्‍थित होते.

१. हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे, रायगड जिल्‍ह्यांचे समन्‍वयक श्री. सागर चोपदार यांनी मंदिर विश्‍वस्‍तांच्‍या संघटनाची आवश्‍यकता विशद केली. त्‍यानंतर सर्वानुमते प्रति महिन्‍याच्‍या दुसर्‍या रविवारी बैठकीसाठी एकत्र येण्‍याचे ठरले.

२. ठाणे जिल्‍हास्‍तरावर मंदिर विश्‍वस्‍तांचे व्‍यापक संघटन, मंदिरांचे आदर्श व्‍यवस्‍थापन, मंदिराच्‍या संदर्भातील प्रशासकीय नियम आणि कायदे विषयक ज्ञान मिळावे; म्‍हणून २ मासांमध्‍ये जिल्‍हास्‍तरीय मंदिर परिषदेचे आयोजन करणार असल्‍याचे ठरवण्‍यात आले. कशेळी येथील दत्त मंदिराचे विश्‍वस्‍त श्री. सुरेश पाटील यांनी मंदिर परिषदेच्‍या आयोजनाची सिद्धता दर्शवली.

३. महाराष्‍ट्र मंदिर महासंघाच्‍या कार्यात बाधा निर्माण करू पहाणार्‍या तिस्‍ता सेटलवाड यांच्‍या ‘सिटीझन फॉर जस्‍टीस अँड पीस’ या संघटनेच्‍या विरोधात निवेदन देण्‍यासाठी  जिल्‍हाधिकारी कार्यालयात एकत्र येण्‍याचे ठरवण्‍यात आले.

वर्तकनगर येथील श्री साईनाथ सेवा समितीचे कार्याध्‍यक्ष श्री. मंगेश नईबागकर शिर्डी येथे झालेल्‍या तृतीय मंदिर परिषदेसाठी उपस्‍थित होते. त्‍यातून प्रेरणा मिळाल्‍याने ठाणे येथील मंदिर विश्‍वस्‍तांच्‍या बैठकीसाठी त्‍यांनी पुढाकार घेऊन साहाय्‍य केले.