नाशिक येथे मंदिर विश्वस्त आणि पुजारी यांचा बैठकीला उत्तम प्रतिसाद !

महाराष्ट्र मंदिर महासंघ आयोजित शिर्डी येथील मंदिर परिषदेनंतर बैठकीचे आयोजन !

बैठकीत सहभागी मंदिर विश्वस्त आणि पुजारी

नाशिक – महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या शिर्डी येथील तिसर्‍या मंदिर परिषदेत झालेल्या ठरावानुसार नाशिक शहरात मंदिर विश्वस्त आणि पुजारी यांची बैठक पार पडली. यात बैठकीचा उद्देश आणि आवश्यकता यांविषयी समितीचे श्री. प्रदीप देशमुख यांनी सांगितले. मंदिर महासंघ आयोजित ३ मंदिर परिषदांत संमत झालेले ठराव, तसेच त्यानंतर आलेले यश आणि पुढील कार्याची दिशा याविषयी नाशिक जिल्हा सहसंयोजक श्री. दिनेश मुठे यांनी विस्तृतपणे विषय मांडला. या बैठकीला एकूण २७ मंदिरांचे विश्वस्त आणि पुजारी उपस्थित होते.

यात ‘अँटी लँड ग्रॅबिंग’ (भूमी प्रतिबंध) कायदा आणण्यासाठी निवेदन देणे, मंदिरात वस्त्रसंहिता चालू करणे, साप्ताहिक महाआरती चालू करणे, तसेच प्रत्येक महिन्याला बैठक चालू ठेवणे हे सर्वानुमते मान्य करण्यात आले.