महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने विविध मागण्यांचे मुंबई जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना विश्वस्त आणि धर्मप्रेमी

मुंबई – महाराष्ट्र शासनाने ‘अँटी लँड ग्रॅबिंग (भूमी प्रतिबंध) कायदा’ आणण्यासाठी अध्यादेश काढावा, तसेच भूमी हडपण्याविरोधी विशेष पथकांची नेमणूक करावी, या मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नावे जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना देण्यात आले. या वेळी निवेदन देतांना नाशिकमधील मुक्तीधाम मंदिर, श्री इच्छामनी मंदिर, श्री बालाजी मंदिर, श्री नारोशंकर मंदिर आदी मंदिराचे विश्वस्त उपस्थित होते.