Election Freebies : शिधा म्हणून व्हिस्की आणि बिअर देणार ! – अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता राऊत

जनतेला काय द्यायला हवे, तेही न कळणारे उमेदवार !

जात पडताळणी समितीकडून काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रहित !

‘रश्मी बर्वे यांनी वर्ष २०२० मध्ये वडिलांच्या शैक्षणिक दस्तावेजांच्या आधारावर जात वैधता प्रमाणपत्र काढले होते; पण त्यासाठी त्यांनी वडिलांचे खोटे शैक्षणिक प्रमाणपत्र सादर केले आहे,’ असा त्यांच्यावर आरोप आहे.

अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये प्रवेश !

‘अमरावती येथून ४ एप्रिल या दिवशी नवनीत राणा यांचे आवेदन प्रविष्ट करणार आहे. नितीन गडकरी यांच्यानंतर नवनीत राणा यांना सर्वाधिक मते मिळतील’, असा दावाही बावनकुळे यांनी केला.

उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच लोकसभेची २ आवेदने भरली !

आपल्या पक्षाचे उमेदवार घोषित होण्यापूर्वीच गायकवाड यांनी आवेदन प्रविष्ट केल्याने त्यांनी बंडखोरी केल्याचे म्हटले जात आहे.

ED Seized Money : घोटाळ्यांतून लुटण्यात आलेले ३ सहस्र कोटी पुन्हा गरिबांना देण्यासाठी कायदा करणार ! – पंतप्रधान मोदी यांचे आश्‍वासन !

प्रत्येक घोटाळ्यातील आरोपींकडून जप्त केलेले पैसे संबंधितांना परत केले पाहिजेत आणि यासाठी कायदा होणार असेल, तर जनतेला आनंदच आहे !

लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून १६० उमेदवारी अर्ज भरले !

२८ मार्च या दिवशी या अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे. ३० मार्च हा अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे.

भाजपच्या मुख्य प्रचारकांमध्ये महाराष्ट्रातील २० जणांचा समावेश !

लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने देशभरातील नेत्यांच्या मुख्य (स्टार) ४० प्रचारकांची पहिली सूची घोषित केली आहे.

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीतून बाहेर, ९ उमेदवारांची घोषणा !

उमेदवारांची नावे घोषित करण्यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली.

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभेसाठी १६ उमेदवारांची नावे घोषित !

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मुंबईमध्ये काँग्रेसला उमेदवारी न मिळाल्यामुळे अप्रसन्नता व्यक्त केली आहे. मुंबईतील जागांविषयी महाविकास आघाडीमध्ये अद्याप निर्णय व्हायचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Goa Loksabha Elections 2024 : पणजी येथे श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेत भाजपच्या नेत्यांचा प्रचाराला प्रारंभ !

या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार सदानंद शेट तानावडे, उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक, दक्षिण गोव्याच्या उमेदवार सौ. पल्लवी धेंपे, काही मंत्री आणि पक्षाचे अन्य पदाधिकारी, तसेच मगोचे श्री. सुदिन ढवळीकर यांची उपस्थिती होती.