काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना त्यांच्या पक्षात किती किंमत आहे, हे माहीत आहे ! – धर्मराव बाबा आत्राम, मंत्री

मुलीच्या लोकसभा उमेदवारीसाठी वडेट्टीवार १० दिवस देहली येथे बसून होते !

धर्मरावबाबा आत्राम, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री

नागपूर – विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना त्यांच्या पक्षामध्ये किती किंमत आहे, हे महाराष्ट्राला माहीत आहे. वडेट्टीवार आपल्या मुलीच्या उमेदवारीसाठी १० दिवस देहली येथे बसून होते; मात्र ते उमेदवारी मिळवू शकले नाही, असे प्रतिपादन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी १२ एप्रिल या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.

विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार

धर्मराव बाबा आत्राम पुढे म्हणाले की, गडचिरोली लोकसभा मतदारसंघासाठी डॉ. उसेंडी यांना उमेदवारी मिळण्यासाठी वडेट्टीवार प्रयत्न करत होते; मात्र तीही मिळवू शकले नाहीत. त्यांच्या मुलीला उमेदवारी न मिळाल्याने ते अप्रसन्न आहेत. ते चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये फिरकलेही नाहीत; मात्र माझ्यावर टीका करत आहेत.