Lok Sabha Speaker 2024 : लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा ओम बिर्ला यांची निवड !

उपाध्यक्षपदासाठी काँग्रेस आग्रही !

भाजपचे खासदार ओम बिर्ला

नवी देहली – भाजपचे खासदार ओम बिर्ला यांची पुन्हा एकदा लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची घोषणा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केली. निवड झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी बिर्ला यांचे अभिनंदन केले. ‘बिर्ला यांचा गेल्या कार्यकाळातील अध्यक्ष होण्याचा अनुभव त्यांना देशाला आणखी मार्गदर्शन करण्यास साहाय्य करेल’, असा विश्‍वास पंतप्रधान मोदी यांनी या वेळी व्यक्त केला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘इंडी’ आघाडीतील घटक पक्षांशी दूरभाषवरून संपर्क साधून एकमताने लोकसभा अध्यक्षांची निवड करण्याची विनंती केली होती.

लोकसभेचे उपाध्यक्षपद काँग्रेसला दिले जावे, अशी मागणी काँग्रेसचे खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी केली आहे. काँग्रेसला हे पद देण्याची सिद्धता भाजपने दर्शवली असली, तरी ‘विरोधकांनी अटी घालू नये’, असेही भाजपचे म्हणणे होते.