भर्तृहरी महताब यांची लोकसभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदी नियुक्ती !

सर्वांत वरिष्ठ खासदार असणार्‍याची केली जाते नियुक्ती  !

भर्तृहरी महताब

नवी देहली – संसदेत १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जूनपासून चालू होत असून यात लोकसभा अध्यक्ष आणि उपसभापती यांची निवडणूक होईल. तत्पूर्वी २० जूनला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकसभेतील सर्वांत वरिष्ठ खासदार असलेले भाजपचे भर्तृहरी महताब यांची ‘प्रोटेम स्पीकर’ (लोकसभेच्या अध्यक्षांची निवड होण्यापूर्वी नियुक्त केलेले तात्पुरते अध्यक्ष) म्हणून नियुक्ती केली. महताब हे नवनिर्वाचित खासदारांना शपथही देतील.

भर्तृहरी महताब हे कटक (ओडिशा) येथून ७ वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी मार्च २०२४ मध्ये बिजू जनता दल पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. वर्ष २०१७ मध्ये त्यांना ‘उत्कृष्ट संसदपटू ’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.