समाजवादी पक्षाचे आझम खान यांच्याकडून अभिनेत्री जयाप्रदा यांच्यावर अश्‍लील शब्दांत टीका

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान आणि त्यांच्या विरोधात भाजपच्या उमेदवार अभिनेत्री जयाप्रदा उभ्या आहेत. खान यांनी जयाप्रदा यांच्यावर अश्‍लील भाषेत टीका केली आहे. राजकारण किती खालच्या स्तरावर गेले आहे, याचे प्रत्यक्ष उदाहरणच आझम खान यांनी दिले आहे !

योगी आदित्यनाथ यांना ३, तर मायावती यांना २ दिवस प्रचार करण्यास बंदी 

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्यावर निवडणूक आयोगाने आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे.

(म्हणे) ‘महाआघाडीचे सरकार आल्यावर शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवू !’ – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या सिंचन घोटाळ्यामुळेच आज पाण्याअभावी शेतकरी देशोधडीला लागला आहे. असे असतांना आता मतांसाठी शेतकर्‍यांना पोकळ आश्‍वासने देण्याचा अधिकार पवार यांना आहे का ?

रस्ता बांधल्यासच मतदान करू !

येथील मतदारसंघातील प्रचार सध्या अंतिम टप्प्यात पोचला आहे;  मात्र जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील सुनेगाव येथे अद्यापही बसची सुविधा पोचली नसल्याने ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. जोपर्यंत रस्ता होत नाही, तोपर्यंत मतदान करणार नाही

उर्मिला मातोंडकर यांच्याविरुद्ध उल्हासनगरमध्ये गुन्हा नोंद

लोकसभा निवडणुकीतील उत्तर मुंबईच्या काँग्रेस उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी एका कार्यक्रमात हिंदूंविषयी अपशब्द काढले. त्यांच्या वक्तव्यावर टीकेची झोड उठली. याविषयी येथील अधिवक्त्या राखी बारोडे यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार करून गुन्हा नोंद करण्याची मागणी केली.

भाजप सरकारने शेतकरी हिताचे काही निर्णय घेतल्याने भाजपला पाठिंबा ! – संजय कोले, शेतकरी संघटना

वसंतदादांच्या ज्या वारसांनी वसंतदादा शेतकरी सहकारी कारखाना बंद पाडण्यास हातभार लावला, ज्या कारखान्याकडे शेतकर्‍यांची कोट्यवधी रुपयांची देणी आहेत, त्याच विशाल पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी ……

हीच का पक्षीय शिस्त ?

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ १० एप्रिल या दिवशी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे भाजप-शिवसेना महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

माजी आमदार संभाजी पवार यांचा भाजपला पाठिंबा !

सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांना माजी आमदार संभाजी पवार यांनी त्यांचा पाठिंबा घोषित केला.

(म्हणे) ‘आदिवासी, मागासवर्गीय आणि मुसलमान यांच्यासाठी काम करणार्‍या धर्मनिरपेक्ष उमेदवारांना मते द्या !’

चर्च संघटनेकडून तेलंगण आणि आंध्रप्रदेश राज्यांतील ख्रिस्ती मतदारांना आवाहन : अशा प्रकारे जाती आणि धर्म यांच्यासाठी संकुचित विचाराने मत देण्याचे राज्यघटनेविरोधी आवाहन करणार्‍या चर्च संघटनेवर निवडणूक आयोगाने कारवाई केली पाहिजे आणि यासाठी हिंदूंच्या संघटनांनी तक्रार केली पाहिजे !

अलवर (राजस्थान) येथे प्रचारसभेत काँग्रेसच्या दोन गटांत हाणामारी

एकमेकांमध्येच हाणामारी करणारे कार्यकर्ते असणारे राजकीय पक्ष कधीतरी समाजातील तेढ नष्ट करून सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करू शकतील का ?

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now