
कोल्हापूर – प्रवासी मतदारांनो, तुम्ही आवश्यक कामासाठी परगावी जात आहात; पण २० नोव्हेंबरला आपले मतदान असलेल्या गावी पोचून मतदानाचा अधिकार बजावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केले. कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक आणि शाहू मैदान येथील के.एम्.टी. स्थानकावर निवडणूक मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. एस्.टी.ने प्रवास करणार्या जिल्ह्यातील मतदारांना गुलाबपुष्प देऊन येत्या
२० नोव्हेंबर या दिवशी मतदान करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कोल्हापूरचे विभाग नियंत्रक शिवराज जाधव, विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यांसह अन्य उपस्थित होते.
एस्.टी. महामंडळाचा मतदार जनजागृतीसाठी विशेष सहभाग !
एस्.टी. महामंडळाचा मतदार जनजागृतीसाठी विशेष सहभाग असून प्रत्येक एस्.टी.मध्ये बसस्थानकावरील कर्मचारी, चालक, तसेच वाहक यांपैकी ज्यांना जमेल, ते प्रवाशांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. जिल्ह्याची मतदान टक्केवारी या वेळी ८० टक्के पार करत एक नवा इतिहास रचूया, असेही ते सांगतांना दिसत आहेत.
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
तलाकच्या धमकीप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंद !
‘रोटरी क्लब ऑफ हुपरी’च्या वतीने १५० गरजू मुलींना विनामूल्य सायकलवाटप
पंढरपूर मंदिर परिसर विकास प्रकल्पात नागरिकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे ! – डॉ. नीलम गोर्हे
सांगली आगारात नव्याने उपलब्ध झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ एस्.टी. गाड्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला
उद्योगस्नेही धोरण आणि दर्जेदार पायाभूत सुविधांसाठी शासन कटीबद्ध ! – डॉ. उदय सामंत, उद्योगमंत्री