‘Meta’ Apologizes For Zuckerberg : फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्या चुकीसाठी ‘मेटा’ची क्षमायाचना !

झुकरबर्ग

कॅलिफोर्निया – फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्या चुकीच्या विधानावर ‘फेसबुक’चे मूळ आस्थापन ‘मेटा’ने भारताची क्षमा मागितली आहे. मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या एका निवेदनात म्हटले होते की, कोरोना महामारीनंतर भारतासह जगभरातील बहुतेक देशांच्या विद्यमान सरकारांना २०२४ मध्ये निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. भारताने यावर तीव्र आक्षेप घेतला होता.

१. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री श्री. अश्‍विनी वैष्णव यांनी मार्क झुकरबर्ग यांचे विधान ‘तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचे’ असल्याचे म्हटले होते. श्री. वैष्णव यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट प्रसारित करून म्हटले होते की, जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारताने २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या, ज्यामध्ये ६४ कोटींहून अधिक मतदारांनी भाग घेतला आणि भारतीय जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एन्.डी.ए.) वर विश्‍वास व्यक्त केला.

२. श्री. अश्‍विनी वैष्णव म्हणाले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा तिसर्‍यांदा निर्णायक विजय हा सुशासन आणि जनतेचा विश्‍वास यांचे प्रतीक आहे.

३. मेटाला टॅग करत अश्‍विनी वैष्णव यांनी म्हटले होते की, झुकरबर्ग स्वतः चुकीची माहिती पसरवत आहेत, हे पहाणे ‘निराशाजनक’ आहे.

संपादकीय भूमिका

झुकरबर्ग भारत सरकारच्या विरोधात जाणूनबुजून खोटी माहिती प्रसारित करून त्याची अपकीर्ती करणार आणि त्यांची आस्थापना क्षमायाचना करण्याचे नाटक करणार ! झुकरबर्ग यांच्यासारख्यांना भारतीय पुरते ओळखून आहेत !