विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवेदन

कोल्हापूर – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, हद्दीतील राजकीय पक्ष/पदाधिकारी यांचे झेंडे, फलक, बॅनर, होर्डिंग्ज आदी हटवण्याच्या संदर्भातील आदेश असतांना त्यानुसार शहरात कार्यवाही चालू झाल्यावर काही भागांत नागरिकांनी त्यांच्या घरावर, खासगी मालमत्तेवर लावलेले, तसेच जागोजागी असलेल्या चौकांमध्ये लावण्यात आलेले धार्मिक ध्वज काढण्याचे प्रकार झाले आहेत. या ध्वजाचा विधानसभा आचारसंहितेशी काहीही संबंध नसतांना नाहक हे ध्वज काढले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घरांवरील, जागोजागी असलेल्या चौकांमध्ये लावण्यात आलेले भगवे ध्वज काढण्यात येऊ नयेत, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल साहाय्यक समाधान शेंडगे यांना देण्यात आले. (असे निवेदन का द्यावे लागते ? प्रशासनाला ते लक्षात कसे येत नाही ? – संपादक)

या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. आनंदराव पवळ, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सहजिल्हासंयोजक श्री. अभिजित पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, हिंदु महासभेचे श्री. राजू तोरस्कर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. महेंद्र अहिरे उपस्थित होते.
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांकडून स्वागत !
तलाकच्या धमकीप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंद !
‘रोटरी क्लब ऑफ हुपरी’च्या वतीने १५० गरजू मुलींना विनामूल्य सायकलवाटप
पंढरपूर मंदिर परिसर विकास प्रकल्पात नागरिकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे ! – डॉ. नीलम गोर्हे
सांगली आगारात नव्याने उपलब्ध झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ एस्.टी. गाड्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला