मध्यप्रदेशातील उज्जैननंतर इंदूर येथेही श्रीराममंदिरासाठी देणगी गोळा करण्यास निघालेल्या फेरीवर धर्मांधांकडून दगडफेक : १२ हून अधिक जण घायाळ

हिंदूंकडे डोळे वर करून बघण्याचेही धाडस धर्मांधांकडून होऊ नये, असा वचक सरकार आणि पोलीस यांनी निर्माण केला पाहिजे !

ईश्‍वरप्राप्ती करण्यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांची प्रक्रिया राबवणे आवश्यक  ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

अहं शेतात उगवणार्‍या तणासारखा आहे, ज्याला संपूर्णत: नष्ट केल्याविना ईश्‍वरीकृपेचे पीक उगवत नाही. त्यामुळे सतत त्याची छाटणी करत रहावी लागते.

६ मे २०२१ या दिवशी लघुग्रह धडकून पृथ्वी नष्ट होणार ! – नॉस्ट्रॅडेमसची भविष्यवाणी

विविध संत आणि द्रष्टे यांनी ‘पुढील २-३ वर्षांत पृथ्वीवर तिसरे महायुद्ध, भूकंप आदी मोठ्या आपत्ती येऊन मोठा विनाश होणार आहे’, असे सांगितले आहे. या काळात स्वरक्षणासाठी साधना करून ईश्‍वराची कृपा संपादन करणेच महत्त्वाचे आहे.

कर्नाटकच्या विधान परिषदेचे उपसभापती धर्मेगौडा यांची आत्महत्या

काही दिवसांपूर्वी विधान परिषद सभागृहामध्ये प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी धर्मेगौडा यांच्याशी गैरवर्तन केले होते. त्यांना सभापतींच्या आसंदीवरून बलपूर्वक खेचून उठवले होते.

अभिनेते रजनीकांत यांच्याकडून राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय रहित केल्याची घोषणा

अभिनेते रजनीकांत यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजकीय पक्ष स्थापन करण्याचा विचार मागे घेतला आहे. रजनीकांत यांनी ३ पानांचे पत्र ट्वीट करत ही घोषणा केली आहे. पक्ष स्थापन करत नसल्याविषयी त्यांनी जनतेची क्षमाही मागितली आहे.

ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या प्रकाराचा भारतात ६ जणांना संसर्ग

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आल्यानंतर संपूर्ण जगात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या नव्या प्रकाराच्या कोरोनाचे संक्रमण झालेले ६ रुग्ण भारतात आढळले आहेत.

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे भर रस्त्यात तरुणावर आक्रमण करून हत्या होत असतांना जनता निष्क्रीय !

ही स्थिती भारतियांना लज्जास्पद होय ! अशा घटनांच्या वेळी जनता पुढे न येण्याचे एक कारण पोलिसांकडून नंतर होणारा त्रास ! पोलीस जनतेचे मित्र नसल्याने जनताही त्यांना साहाय्य करण्यास पुढे येत नाही !

इस्रायल नेहमीच भारताला सैनिकी साहाय्य करत राहील ! – इस्रायल

इस्रायलने भारताला नेहमीच साथ दिली आहे, हे चांगलेच आहे; मात्र भारताने स्वबळावर शत्रूराष्ट्रांशी सामना करावा, असेच भारतियांना वाटते !

आंध्रप्रदेशातील श्रीशैलम् मंदिरावर धर्मांधांनी नियंत्रण मिळवले आहे ! – भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांचा आरोप

एका मंदिरावर धर्मांध नियंत्रण मिळवतात आणि हिंदू गप्प बसतात, हे संतापजनक ! अनेक शतके धर्मांध हिंदूंवर अत्याचार करत असूनसुद्धा हिंदूंच्या वृत्तीत पालट न झाल्याने म्हणजे साधनेचे आध्यात्मिक बळ न वाढवल्याने त्यांची झालेली ही दुःस्थिती !

भाजपच्या आमदाराने पूजेच्या ठिकाणी असलेली पूजा सामग्री लाथेने उडवली !

जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे हुतात्मा स्मारकाच्या भूमीपूजनाचे निमंत्रण न दिल्याने आमदाराची कृती ! भाजपच्या आमदारांकडून असे घडणे अपेक्षित नसून अशा प्रकारांमुळे समाजात चुकीचा संदेश जाईल, हे निश्‍चित !