इस्रायल नेहमीच भारताला सैनिकी साहाय्य करत राहील ! – इस्रायल

इस्रायलने भारताला नेहमीच साथ दिली आहे, हे चांगलेच आहे; मात्र भारताने स्वबळावर शत्रूराष्ट्रांशी सामना करावा, असेच भारतियांना वाटते !

इस्रायलचे राजदूत रॉन मालका

तेल अवीव (इस्रायल) – काहीही झाले, तरी इस्रायल भारताला सैनिकी साहाय्य करत राहील, असे विधान भारतातील इस्रायलचे राजदूत रॉन मालका यांनी केले आहे.

मालका म्हणाले की, इस्रायल नेहमी मित्र म्हणून भारतासमवेतच राहील. सुरक्षेसंबंधी भारताला जेव्हा आमची आवश्यकता भासेल, तेव्हा आम्ही भक्कमपणे भारताच्या पाठीशी उभे राहू. अशारितीनेच मित्रता पुढे नेली जाते, जेव्हा विशेषकरून ती भारतासारख्या देशांसमवेत असते. आम्ही कुणाच्या विरुद्ध नाही; पण भारतासमवेत  आहोत.