समाजाला दिशादर्शन करणारे राजकारणी आता आत्महत्या करत असतील, तर सामाजिक दृष्ट्या हे चिंताजनक होय !
बेंगळुरू (कर्नाटक) – राज्याच्या विधान परिषदेचे उपसभापती आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे नेते एस्.एल्. धर्मेगौडा यांनी रेल्वेगाडीसमोर झोकून देऊन आत्महत्या केली. रेल्वेरुळावर त्यांचा मृतदेह आढळून आला. येथे त्यांच्याजवळून मृत्यूपूर्वी लिहिलेले पत्रही सापडले आहे.
Karnataka council deputy chief found dead on railway track https://t.co/Ck7n9K697F
— TOI Bengaluru (@TOIBengaluru) December 30, 2020
चिक्कमगळुरू जिल्ह्यातील कादूरजवळील एका रेल्वेरुळावर रात्री २ वाजता त्यांचा मृतदेह आढळून आला. काही दिवसांपूर्वी विधान परिषद सभागृहामध्ये प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी धर्मेगौडा यांच्याशी गैरवर्तन केले होते. त्यांना सभापतींच्या आसंदीवरून बलपूर्वक खेचून उठवले होते. काँग्रेसच्या आमदारांनी त्यांच्यावर अवैधरित्या सभागृहाच कामकाज चालवत असल्याचा आरोप केला होता.