आर्थिक अपहाराचे आरोप पुराव्यानिशी सिद्ध करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करीन ! – खासदार संजय राऊत, शिवसेना
आर्थिक घोटाळ्यामध्ये माझ्या कुटुंबियांचे नाव विनाकारण गोवण्यात आले आहे. मी आव्हान देतो की, पुराव्यानिशी ते सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सिद्ध रहा, अशी चेतावणी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ‘ट्वीट’द्वारे दिली आहे.
अर्णव गोस्वामी यांच्याकडून पैसे मिळाल्याची ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी दासगुप्ता यांनी स्वीकृती दिल्याची पोलिसांकडून माहिती
रिपब्लिक टी.व्ही.चे संपादक अर्णव गोस्वामी यांनी ६ वेळा प्रत्यक्ष भेट घेऊन ‘टी.आर्.पी.’ वाढवण्यासाठी पैसे दिल्याची स्वीकृती भारत ‘ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल’ (बॉर्क)चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांनी दिली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
सौ. वर्षा राऊत यांना अन्वेषणासाठी उपस्थित रहाण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाची दुसरी नोटीस
हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि ‘पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक यांतील यांमधील आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी खासदार संजय राऊत यांच्या पत्नी सौ. वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून दुसरी नोटीस पाठवण्यात आली आहे.
विवाहासाठी धर्मांतर करायला लावणे मान्य करता येणार नाही ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
देशात चालू असलेल्या सामूहिक धर्मांतराच्या घटना थांबायला हव्यात. विवाहासाठी धर्मांतर करायला लावणे मान्य करता येणार नाही, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश सरकारांनी केलेल्या लव्ह जिहादविरोधी कायद्याचे समर्थन केले.
भारताच्या अंतर्गत सूत्रांवर बोलणे बंद करा !
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शेतकरी आंदोलनावरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना फटकारले !
फ्रान्समध्ये नाताळाच्या मेजवानीला गेल्याने धर्मांध तरुणांकडून मुसलमान मित्राला मारहाण
भारतातील हिंदूंना सर्वधर्मसमभावाचे आणि धर्मनिरपेक्षेतेचे डोस पाजण्यात आल्याचे हिंदूंना सर्व धर्म सारखेच वाटतात; मात्र जगातील धर्मांधांना असे वाटत नाही, याचे हे आणखी एक उदाहरण !
भारतात आता ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी
ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा उपाय म्हणून केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानांवर आता ३१ जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे. ही बंदी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत होती. त्यानंतर ती ७ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली होती.
‘अॅमेझॉन’च्या ‘किंडल’ या ऑनलाईन पुस्तक विक्री केंद्रावर उपलब्ध पुस्तकांद्वारे ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन !
अॅमेझॉनने विविध प्रकारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न आतापर्यंत केला आहे. हिंदूंनी विरोध केल्यावर अॅमेझॉनकडून क्षमा मागितली जाते आणि वस्तू मागे घेतल्या जातात; मात्र अॅमेझॉनची मूळ हिंदुद्वेषी वृत्ती पालटलेली नाही.
कोरोनाच्या लसीमध्ये गायीचे रक्त वापरण्यात आल्याने त्याला अनुमती नाकारावी !
जर मुसलमान आणि हिंदु या लसीद्वारे धार्मिक भावना दुखावल्या जाण्याची शक्यता वर्तवत आहेत, तर सरकारने या लसीमध्ये कोणत्या घटकांचा वापर करण्यात आला आहे, हे अधिकृतपणे घोषित करावे, असेच जनतेला वाटते ! – स्वामी चक्रपाणी, हिंदू महासभा