चित्रीकरण करून व्हिडिओ काढला; मात्र बचाव केला नाही !
|

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथे भर रस्त्यात २ व्यक्तींकडून तरुणाची हत्या करण्यात येत असतांना रस्त्यावर असणार्या लोकांनी ही हत्या रोखण्याऐवजी एकाने त्याचे चित्रीकरण केले आणि त्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला. तरुणावर आक्रमण झाल्यानंतर तो घायाळ अवस्थेत असतांनाही लोकांनी त्याला रुग्णालयात नेण्यासाठी साहाय्य केले नाही. या तरुणाचे अजय असे नाव आहे.
Crime in UP: गाजियाबाद में बेखौफ बदमाशों का तांडव, बीच सड़क पर लोहे की रॉड से पीट-पीट कर युवक की हत्या, तमाशा देखते रहे लोग https://t.co/5VZ6s1k9uB via @DNHindi @ghaziabadpolice
— डाइनामाइट न्यूज़ (@DNHindi) December 29, 2020
अजयचा भाऊ संजय याने काही दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात तक्रार केली होती. पोलिसांनी या वेळी त्यांना तडजोड करण्यास सांगितले होते. फुलांच्या दुकानावरून संजय आणि मुख्य आरोपी गोविंद यांच्यात वाद होता. गोविंद आणि त्याचा मित्र अमित यांनी अजयवर आक्रमण करून त्याची हत्या केली. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.
इराणच्या आक्रमणात जॉर्डनमधील २ अमेरिकी सैनिक ठार : अमेरिकेचे प्रत्युत्तर !
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Bangladesh Massive Protests : बांगलादेशात हिंदु तरुणाच्या अन्याय अटकेविरुद्ध अल्पसंख्यांकांची निदर्शने
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !