पिंपरी (पुणे) – ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये (विवाह न करता स्त्री-पुरुष यांनी एकत्र रहाणे) रहाणार्या महिलेकडून सतत पैशांची मागणी आणि चारित्र्यावर संशय यावरून हत्या करण्यात आली. यातून दिनेश ठोंबर याला अटक करण्यात आली असून जयश्री मोरे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये असतांना झालेल्या ३ वर्षीय मुलाला आळंदीमध्ये तसेच सोडून दिल्याचेही अन्वेषणातून पुढे आले.
दिनेश आणि जयश्री गेली ५ वर्षांपासून वाकड येथे रहात होते. त्या दोघांचे काही दिवसांपासून पटत नव्हते. २४ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या दोघांच्या वादातून दिनेशने जयश्रीच्या डोक्यात हातोड्याने घाव घातले. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.
संपादकीय भूमिकापाश्चात्त्यांच्या अंधानुकरणाचा दुष्परिणाम ! समाजातील ढासळणारी नीतीमत्ता रोखण्यासाठी नैतिक मूल्याधिष्ठित धर्मशिक्षणाविना पर्याय नाही ! |