६ मे २०२१ या दिवशी लघुग्रह धडकून पृथ्वी नष्ट होणार ! – नॉस्ट्रॅडेमसची भविष्यवाणी

विविध संत आणि द्रष्टे यांनी यापूर्वीच ‘पुढील २-३ वर्षांत पृथ्वीवर तिसरे महायुद्ध, भूकंप आदी मोठ्या आपत्ती येऊन मोठा विनाश होणार आहे’, असे सांगितले आहे. अशा काळात स्वतःचे रक्षण होण्यासाठी साधना करून ईश्‍वराची कृपा संपादन करणेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी हिंदूंनी तरी प्रयत्न करावेत !

६ मे २०२१ या दिवशी पृथ्वीला एक लघुग्रह धडकेल आणि त्यामुळे संपूर्ण जगाचा नाश !

लंडन (ब्रिटन) –  ६ मे २०२१ या दिवशी पृथ्वीला एक लघुग्रह धडकेल आणि त्यामुळे संपूर्ण जगाचा नाश होऊ शकतो, अशी भविष्यवाणी प्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडेमसने करून ठेवलेली आहे. आताही भविष्यवाणी कितपत खरी ठरेल, हे पहावे लागेल. नॉस्ट्रॅडेमसने वर्ष ३७९७ पर्यंतचे भविष्य वर्तवून ठेवलेले आहे.

१. नॉस्ट्रॅडेमसने म्हटल्याप्रमाणे, वर्ष २०२१ हे विनाशकारी घटनांनी भरलेले असणार आहे. यावर्षी पृथ्वीवर मेंदूत ‘मायक्रोचिप’ लावलेले सैनिक पहायला मिळणार आहेत. ६ मे २०२१ या दिवशी आकाशात आगीचे गोळे दिसतील, तसेच आकाशात एक ठिणगीही दिसून येईल. लघुग्रहावर लक्ष ठेवून बसलेले शास्त्रज्ञ म्हणतात, ‘२००९ केएफ् १’ हा लघुग्रह ६ मे २०२१ या दिवशी पृथ्वीला धडकण्याची शक्यता आहे, तसेच सैनिकांच्या डोक्यात ‘मायक्रोचिप’ बसवण्याचे तंत्र विकसित होईल. सैनिकांसाठी वापरल्या जाणार्‍या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती होईल.’

(सौजन्य : Nedrick News नेड्रिक न्यूज)

२. नॉस्ट्रॅडेमसने असाही दावा केला आहे की, रशियन शास्त्रज्ञ जैविक शस्त्र सिद्ध करतील, ज्यामुळे संपूर्ण मानवजात नष्ट होऊ शकते. कुणी महान व्यक्ती जिवंत रहाणार नाही, सर्व जग संपेल.

३. वर्ष २०२१ मध्ये जगातील काही भागांत मोठा भूकंप होईल.