महापालिका आयुक्तांच्या आदेशाने कुपवाड (सांगली) मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ

सूतगिरणी ते कुपवाड औद्योगिक वसाहतीच्या दोन्ही बाजूला अतिक्रमणे असल्याची तक्रार उद्योग मित्र बैठकीत करण्यात आली होती. या तक्रारीची नोंद घेत महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी या मार्गावरील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले होते.

(म्हणे) ‘आम्ही आमच्या भूभागावरच बांधकाम केले आहे !’

चीनने अरुणाचल प्रदेशमधील भारताच्या सीमेमध्ये घुसखोरी करून एक गाव वसवल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. त्यावर चुनयिंग यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

काँग्रेसच्या काळात म्हणजे १९८० च्या दशकापासून चीनचे भारतीय भूमीवर नियंत्रण !

काँग्रेसच्या काळात झालेल्या चुका भाजपच्या राज्यात सुधारणे आवश्यक आहेत, हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !

मालवणी (मुंबई) येथील शेकडो हिंदु परिवारांचे धर्मांधांच्या दहशतीमुळे पलायन !

हिंदूबहुल देशात हिंदूंची अशी स्थिती होणे, हे शासकीय यंत्रणांना लज्जास्पद होय ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन आवाज उठवणे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करणे किती अपरिहार्य आहे, हे यातून लक्षात येईल !

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांनी घेतली खासदार शरद पवार यांची भेट

अभिनेता सोनू सूद यांच्यावर येथील महापालिकेकडून अनधिकृत बांधकाम केल्याच्या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. त्यातच १३ जानेवारी या दिवशी सोनू सूद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी सकाळी भेट घेतली. या वेळी सूद यांनी पवार यांच्याशी चर्चा केली.

अभिनेता सोनू सूद यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांना अनधिकृत बांधकाम प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने सोनू सूद यांच्या इमारतीवरील कोणत्याही कारवाईवर १३ जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे.

(म्हणे) ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या चर्चच्या भूमीत झालेल्या धार्मिक विधीचा निषेध ! – एलिना साल्ढाणा, भाजपच्या स्थानिक आमदार

ती भूमी कोणाचीही वैयक्तिक नाही, तर सरकारची आहे ! असे असतांना हिंदूंना तेथे जाण्यापासून कोणत्या आधारावर रोखले जात आहे ?

ऐतिहासिक बाणगंगेच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन जलस्रोत बाधित करणार्‍या खोदकामाला स्थगिती

बाणगंगा हा आपल्या संस्कृतीचा ठेवा आहे. ही संस्कृती टिकवली पाहिजे. बांधकाम व्यावसायिक येथे रात्रीचे काम करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई होईल. जोपर्यंत याविषयीचा अहवाल येत नाही, या कामाला स्थगिती देण्यात येईल – महापौर, मुंबई

शंखवाळी तीर्थक्षेत्रावरील पुरातन श्री विजयादुर्गा मंदिराच्या ठिकाणी पूजा-अर्चा आणि नामस्मरणाचा कार्यक्रम यांना स्थानिक ख्रिस्त्यांचा विरोध !

दुसर्‍या भूमीच्या सर्व्हे क्रमांकावर अनुमती घेऊन ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ येथे फेस्ताचे आयोजन करणार्‍या ख्रिस्त्यांना पोलिसांनी समज का दिली नाही ?

चेन्नई येथे मंदिरासाठीची आरक्षित भूमी महापालिकेने सभागृह बांधण्यासाठी कह्यात घेतल्याच्या विरोधात भारत हिंदू मुन्नानीचे आंदोलन

हिंदूंना भारतात कुणीच वाली नसल्याने अशा घटना सरकारी यंत्रणांकडून होत आहेत. ही स्थिती रोखण्यासाठीच हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !