(म्हणे) ‘आम्ही आमच्या भूभागावरच बांधकाम केले आहे !’

चीनच्या उलट्या बोंबा !

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्या हुआ चुनयिंग

बीजिंग (चीन) – जंगनान क्षेत्रावरील (दक्षिण तिबेटमधील) चीनची स्थिती स्पष्ट आणि स्थिर आहे. आम्ही कधीही तथाकथित अरुणाचल प्रदेशला मान्यता दिलेली नाही. आम्ही आमच्या भूभागावर चीनची विकासकामे करणे आणि बांधकाम करणे, ही सामान्य गोष्ट आहे. हे आमचे क्षेत्र आहे, त्यामुळे आम्हाला कुणी दोष देऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी व्यक्त केली.

चीनने अरुणाचल प्रदेशमधील भारताच्या सीमेमध्ये घुसखोरी करून एक गाव वसवल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. त्यावर चुनयिंग यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. अरुणाचल प्रदेश हा तिबेटचा भाग असल्याचा दावा सातत्याने चीनकडून करण्यात येत आहे.