नवी देहली – कॅनडातील ‘द ग्लोब आणि मेल’ या वृत्तपत्राने कॅनडातील सरकारी अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्याचा संदर्भ देत प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये ‘खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येची माहिती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही होती’, असा दावा केला होता. यावर आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी ‘वृत्तपत्रातील विधान हास्यास्पद असून आम्ही हा दावा फेटाळून लावत आहोत’, असे म्हटले आहे.
रणधीर जैस्वाल पुढे म्हणाले की, आम्ही शक्यतो बातम्यांवर प्रतिक्रिया देत नाहीत. तथापि या बातमीत अतिशय हास्यास्पद विधाने करण्यात आली असून ती फेटाळण्यासारखीच आहेत. जर अशी डागाळलेली मोहीम चालूच राहिली, तर दोन देशांमध्ये आधीच ताणलेले संबंध आणखी बिघडू शकतात.