चेन्नई येथे मंदिरासाठीची आरक्षित भूमी महापालिकेने सभागृह बांधण्यासाठी कह्यात घेतल्याच्या विरोधात भारत हिंदू मुन्नानीचे आंदोलन

तमिळनाडूमध्ये हिंदुविरोधी अण्णाद्रमूक सरकार अस्तित्वास असल्याने अशा घटना घडत आहेत. हिंदूंना भारतात कुणीच वाली नसल्याने अशा घटना सरकारी यंत्रणांकडून होत आहेत. ही स्थिती रोखण्यासाठीच हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

चेन्नई – चेन्नई माथूर येथील ६८ क्रमांकाचा भूखंड ‘सर्व शक्ती अम्मन’ मंदिर बांधण्यासाठी आरक्षित करण्यात आला होता; मात्र आता तेथे  चेन्नई कम्युनिटी हॉल बांधण्यासाठी महानगरपालिकेने प्रस्तावित केले आहे. मंदिराची आरक्षित भूमी कह्यात घेण्याच्या प्रयत्नांना रोखण्यासाठी चेन्नई महानगरपालिकेच्या विरोधात आणि सभागृह बांधण्यापासून रोखण्यासाठी भारत हिंदू मुन्नानी संघटनेने एस्. डिल्ली बाबू यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन केले. त्यात महानगरपालिकेविरुद्ध घोषणा देण्यात आल्या. मद्रास मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटीने मशिदी आणि चर्च बांधण्यासाठी भूमी दिल्या आहेत; मात्र आता मंदिर बांधण्यासाठी दिलेली भूमी चेन्नई महानगरपालिकेने कम्युनिटी हॉल बांधण्यासाठी नियंत्रणात घेतली आहे.