बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांनी घेतली खासदार शरद पवार यांची भेट

मुंबई – अभिनेता सोनू सूद यांच्यावर येथील महापालिकेकडून अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप होत आहे. उच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी चालू आहे. त्यातच १३ जानेवारी या दिवशी सोनू सूद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी सकाळी भेट घेतली. या वेळी सूद यांनी पवार यांच्याशी चर्चा केली. या वेळी नेमकी काय चर्चा झाली याविषयी माहिती मिळू शकलेली नाही.

सोनू यांच्यावर बृहन्मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामाप्रकरणी वारंवार नोटीस बजावून आणि कारवाई करूनही त्यांनी कायद्याचे उल्लंघन करणे थांबवले नाही. त्यामुळे तो वारंवार कायदे मोडणारा गुन्हेगारच आहे, असा दावा महापालिकेने १२ जानेवारी या दिवशी उच्च न्यायालयात केला होता, तसेच सोनू यांना कारवाईपासून कोणताही दिलासा देण्यात येऊ नये, अशी मागणीही महापालिकेने केली होती.