सरकारी कर्मचार्यांवर जमावाकडून दगडफेक !
नागपूर – मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील किल्ला परिसरात बूथ क्रमांक २६८ मधील इ.व्ही.एम्. यंत्र नेणारी गाडी आणि सरकारी कर्मचारी यांच्यावर जमावाने दगडफेक करून आक्रमण केले. कोतवाली पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून या कर्मचार्यांना सुखरूप बाहेर काढले. काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांच्या कार्यकर्त्यांनी हे आक्रमण केले आहे, असा आरोप केला जात आहे. यात वाहनाची हानी झाली; पण यंत्र सुरक्षित आहे.
राज्यात एकूण ६५.११ टक्के मतदान !
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत राज्यात एकूण ६५.११ टक्के मतदान झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ७६.२५ टक्के मतदान झाले.
संपादकीय भूमिकाइ.व्ही.एम्. यंत्र नेणार्या गाडीवर आक्रमण करणारी काँग्रेस निवडून आल्यावर कसे राज्य करील, हे लक्षात येते ! |