मुंबई – राज्यात १०० टक्के महायुतीचे सरकार येणार, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. ते म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील जनतेत मोठा पालट झाला आहे. शेतकरी, महिला आणि समाजातील सर्वच घटक यांच्यासाठी सरकारने योजना राबवल्या. गेल्या ६ महिन्यांत महायुती सरकारने अनेक योजना कार्यान्वित केल्या. त्या वेळी विरोधकांकडून ‘राज्यघटना पालटणार’ यांसारखे वेगवेगळे खोटे नॅरेटिव्ह (कथानक) पसरवण्यात आले; परंतु पंतप्रधान मोदी यांना कोणतीही शक्ती किंवा राज्यघटना संपवू शकत नाही. राज्यात याचा परिणाम दिसत होता. त्यामुळे मतदानोत्तर चाचण्यांनुसार (‘एक्झिट पोल’नुसार) १०० टक्के महायुतीचे सरकार येईल, असा मला विश्वास आहे.’’