मुंबई – हुतात्मा दिनाच्या निमित्ताने २१ नोव्हेंबर या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करणार्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. फ्लोरा फाऊंटन येथील हुतात्मा स्मारकाला भेट देऊन एकनाथ शिंदे यांनी स्मारकाला पुष्पचक्र अर्पण केले. या वेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर उपस्थित होते.
मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती व्हावी, यासाठी २१ नोव्हेंबर १९५६ या दिवशी काढलेल्या मोर्चावर मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी पोलिसांना गोळीबार करण्याचा आदेश दिला. यात १०६ जणांना हौतात्म्य आले. याच्या स्मरणार्थ वर्ष १९६५ मध्ये मुंबईत हुतात्मा स्मारक बांधण्यात आले. वर्ष २००० पासून राज्यात ‘हुतात्मा दिन’ साजरा केला जातो.