महापालिका आयुक्तांच्या आदेशाने कुपवाड (सांगली) मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ

अतिक्रमण हटवणारे महापालिकेचे पथक

कुपवाड (सांगली), ३० जानेवारी (वार्ता.) – कुपवाड जकात नाका या मुख्य मार्गावरील दोन्ही बाजूला असणारी अतिक्रमणे काढण्याची मोहीम सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने चालू झाली आहे. सूतगिरणी ते कुपवाड औद्योगिक वसाहतीच्या दोन्ही बाजूला अतिक्रमणे असल्याची तक्रार उद्योग मित्र बैठकीत करण्यात आली होती. या तक्रारीची नोंद घेत महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी या मार्गावरील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले होते.

या कामगिरीत स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील, सिद्धांत ठोकळे, अतुल आठवले, विकास कांबळे, औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे अधिकारी राजू अन्नछत्रे, तसेच महापालिका अतिक्रमण विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते