Siddharth Marries Penelope : महाकुंभक्षेत्रात संतांच्या उपस्थितीत देहलीच्या योगगुरु समवेत विदेशी तरुणीचा हिंदु पद्धतीने विवाह !
कुंभक्षेत्री ग्रीस येथील पेनेलोप नावाची तरुणी आणि देहली येथील योगगुरु सिद्धार्थ शिव खन्ना यांनी हिंदु परंपरेनुसार विवाह केला. या विवाह सोहळ्यात साधू-संत वर्हाडी म्हणून आले होते, तर जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी यतींद्रानंद गिरि यांनी कन्यादान केले.