(‘सॅमको ट्रेडिंग अॅप’ हे प्रगतशील व्यापारासाठी अनुकूल धोरण ठरण्याविषयी साहाय्य करते.)
मुंबई – यू ट्यूब वाहिनीवरून प्रसारित होणार्या एका विज्ञापनात एका कावळ्यासमोर पितृपक्षात देत असल्याप्रमाणे पितरांसाठीचे नैवेद्याचे ताट ठेवलेले आहे. तेथे उभा राहून एक तरुण त्याला म्हणतो, ‘आजोबा, तुम्ही खाऊन घ्या. तुम्हालाही असे वाटत आहे का, की मी ऑप्शन ट्रेडिंग’मध्ये प्रगती करू शकणार नाही ? मी करू शकतो ….’ असा संवाद करतांना कावळाही त्याला त्याप्रमाणे प्रतिसाद देतो. अशा स्वरूपाचे ‘सॅमको ट्रेडिंग अॅप’च्या आस्थापनाचे विज्ञापन करण्यात आले आहे.
View this post on Instagram
यातून हिंदु धर्म, तसेच पितृपक्षातील पितरांना नैवेद्य दाखवणे या कृतीचा अवमान होत आहे.
(ही छायाचित्रे / व्हिडीओ देण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. – संपादक)
संपादकीय भूमिकाकोणतेही विज्ञापन करण्यासाठी प्रत्येक वेळी हिंदु धर्माचाच वापर केला जातो, हे संतापजनक ! हिंदू संघटित नसल्याचाच हा परिणाम आहे ! |