व्यावसायिक उद्देशांसाठी देवतांचा वापर : एक गंभीर अपराध !

अलीकडील एका घटनेमध्ये एका आस्थापनाने हिंदूंना पूजनीय असलेल्या श्री गणेशदेवतेला ‘पिझ्झा डिलिव्हरी बॉय’च्या रूपात विज्ञापनामध्ये दाखवून हिंदूंमध्ये संताप निर्माण केला आहे. या असंवेदनशील विज्ञापनामुळे कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना गंभीरपणे दुखावल्या गेल्या आहेत.

 

पर्वरी येथील ‘ला पिनोझ पिझ्झा’ या आस्थापनाच्या काचेवर रेखाटण्यात आलेले सुधारित विज्ञापन

१. हिंदु धर्मातील देवतांचा अपमान ही एक वाढती चिंता !

हिंदु धर्मातील देवतांचा व्यावसायिक उद्देशांसाठी वापर केला जातो यावर लक्ष देणे आवश्यक आहे. अन्य धर्मांतील श्रद्धास्थानांचा अशा प्रकारे वापर करणे दुर्मिळ आहे; पण हिंदु धर्मातील देवतांचा अनेकदा उपहास आणि अपमान केला जातो. यामुळे हिंदु जनतेत अस्वस्थता आणि निराशा निर्माण होते, ज्यामुळे तिच्या मनात धार्मिक विश्वासांना इतरांप्रमाणेच आदर दिला जात नाही, असे वाटते. पर्यायाने सध्याच्या काळात हिंदु देवतांना व्यावसायिक उद्देशांसाठी वापरले जाणे, ही एक वाढती चिंता आहे.

२. हिंदु देवतांचा अपमान करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची आवश्यकता !

श्री. नारायण नाडकर्णी

असंबद्ध किंवा अपमानजनक पद्धतीने हिंदु देवतांचे चित्रण करणे, हे केवळ हिंदु धर्मियांची मने दुखावणारे नाही, तर कायद्याने दंडनीयही आहे. हिंदु देवतांचे विडंबन करण्यामध्ये गुंतलेल्या व्यक्ती, संस्था वा आस्थापने यांविरुद्ध सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे; कारण यामुळे धर्मभावना दुखावल्या जाऊन सामाजिक तणाव निर्माण होण्याची आणि सामाजिक शांतता बिघडण्याची शक्यता असते.

३. हिंदु देवतांचा उपहास करणार्‍यांविरुद्ध समस्त हिंदूंनी एकत्र येणे महत्त्वाचे !

हिंदूंच्या देवतांच्या विडंबनाच्या कृत्यांचा निषेध करण्यासाठी हिंदु समुदायाने एकत्र येणे आणि स्वतःची मते व्यक्त करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हिंदु देवतांचा उपहास सहन केला जाणार नाही आणि हिंदु समुदायाला अन्य धार्मिक गटांसारखा आदर मिळावा यांसाठी हिंदूंनी आग्रह धरला पाहिजे.

४. सरकारची भूमिका

हिंदु देवतांना व्यावसायिक विज्ञापनांत वापरणे, ही एक अपमानजनक आणि अस्वीकारार्ह प्रथा आहे. हे थांबण्यासाठी सरकार आणि हिंदु समुदाय यांनी एकत्र येऊन हिंदूंच्या धार्मिक भावना जपण्याचे कार्य करणे आवश्यक आहे. अशा कृत्यांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींना त्यांच्या कृत्यांसाठी उत्तरदायी धरले पाहिजे. हिंदूंनी संघटित होऊन या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे आणि सरकारला हिंदु धर्म अन् हिंदू यांच्या संरक्षणासाठी कठोर कायदे करण्यास भाग पाडले पाहिजे.

– श्री. नारायण नाडकर्णी, फोंडा, गोवा.