श्रीराम, श्रीकृष्ण, तसेच भगवद्गीता, महाभारत, रामायण आणि गोमाता यांना राष्ट्रीय सन्मान मिळाला पाहिजे !

अभिव्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा धार्मिक स्वातंत्र्य अतिशय महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने भारतात ईशनिंदा किंवा कठोर कायदा नसल्याने गुन्हेगारांना कठोर शिक्षा देता येत नाही. यातूनच मोठ्या प्रमाणात हिंदु देवतांचा अवमान होईल, अशा पद्धतीने विज्ञापने दिली जातात.

कर्ज देणारे आस्थापन ‘नावी’च्या विज्ञापनातून साधूचा अवमान

हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करणार्‍यांना कठोर शिक्षा होत नसल्याने अशा घटना सातत्याने घडत असतात. या घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

जागृत हिंदूंचा रेटा !

इथे दिलेली उदाहरणे म्हणजे हिंदू जागृत झाल्यास काय घडू शकते ? याची झलकच आहे. हिंदू आता शांत न रहाता त्यांना जे जे अयोग्य वाटते त्याला निवेदन देणे, दूरभाषद्वारे निषेध नोंदवून, पत्र पाठवून, सामाजिक माध्यमांवर पोस्ट करून विरोध करत आहेत. परिणामस्वरुप, अनेकांना त्यांची विज्ञापने पालटावी लागत आहेत !