हिंदूंच्या विरोधानंतर ‘फिनोलेक्स’ आस्थापनाने भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणारे विज्ञापन हटवले !

हिंदु जनजागृती समितीने ‘एक्स’वरून (पूर्वीच्या ट्विटरवरून) केला होता विरोध !

मुंबई – पीवीसी पाईपचे उत्पादन करणार्‍या ‘फिनोलेक्स’ आस्थापनाने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने एक विज्ञापन त्याच्या फेसबुक खात्यावरून प्रसारित केले होते.  या विज्ञापनात भगवान श्रीकृष्णाच्या हातामध्ये बासुरीऐवजी पीवीसी पाईप दाखवण्यात आले होते. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने ट्वीट करून याला विरोध करत विज्ञापन मागे घेण्याची मागणी केली होती.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

यानंतर त्याला सहस्रो धर्माभिमान्यांनीही विरोध केल्यावर काही घंट्यांतच फिनोलेक्सने त्याच्या फेसबुक पानावरून हे विज्ञापन हटवले; मात्र याविषयी या आस्थापनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.