पुणे येथे विज्ञापन फलकाद्वारे श्री गणेशाचे विडंबन !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या अशा आस्थापनाच्या उत्पादनांवर भाविकांनी बहिष्कार घालायला हवा, तसेच अशाप्रकारे विडंबन रोखण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न करणे आवश्यक आहे !

‘झोमॅटो’कडून हिंदूंची क्षमायाचना !

धर्म, देवता आदींच्या अवमानाविषयी भारतात कठोर कायदा नसल्यामुळे कुणालाच याचा धाक नाही. पाकिस्तानमध्ये अशा अवमानासाठी फाशीची शिक्षा दिली जाते. भारतात असे कधी होईल ?

हिंदु जनजागृती समितीने पोलिसांना दिलेल्या निवेदनानंतर ‘अ‍ॅमेझॉन’ने चित्र हटवले !

देवतांच्या विडंबनाच्या विरोधात तत्परतेने कृती करणार्‍या हिंदु जनजागृती समितीचे अभिनंदन !

‘मलबार गोल्ड’चा हिंदुद्वेष !

बहुसंख्य हिंदूंच्या देशात राहून ही आस्थापने, संघटना, संस्था हिंदुविरोधी कारस्थाने रचत असतांना त्यांना वैध मार्गाने विरोध करण्याची कृती सर्वाेत्तम आहे. हिंदूंचा सन्मान विज्ञापनकर्ता, अभिनेते, अभिनेत्री, चित्रपट अथवा मालिका निर्माते यांनी राखणे आवश्यकच आहे, अन्यथा वैध मार्गाने विरोध ठरलेलाच आहे, हे निश्चित !

हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समरजितसिंह घाटगे यांची तक्रार प्रविष्ट करून घेण्यास कागल पोलिसांचा नकार !

हसन मुश्रीफ यांनी विज्ञापनामध्ये प्रभु श्रीरामचंद्रांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप ! हिंदूंवर गुन्हा नोंद करण्यास तत्परता दाखवणारे पोलीस हिंदूंच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात, हे लक्षात घ्या !

चॉकलेटच्या वेष्टनावर भगवान जगन्नाथाचे चित्र छापल्याप्रकरणी ‘नेस्ले’कडून क्षमायाचना

नेस्लेच्या ‘किटकॅट’ चॉकलेटच्या वेष्टनावर हिंदु देवतांची छायाचित्र छापल्यानंतर त्या विरोधात लगेच आवाज उठवणार्‍या जागृत हिंदूंचे अभिनंदन !

श्रीराम, श्रीकृष्ण, तसेच भगवद्गीता, महाभारत, रामायण आणि गोमाता यांना राष्ट्रीय सन्मान मिळाला पाहिजे !

अभिव्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा धार्मिक स्वातंत्र्य अतिशय महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने भारतात ईशनिंदा किंवा कठोर कायदा नसल्याने गुन्हेगारांना कठोर शिक्षा देता येत नाही. यातूनच मोठ्या प्रमाणात हिंदु देवतांचा अवमान होईल, अशा पद्धतीने विज्ञापने दिली जातात.

कर्ज देणारे आस्थापन ‘नावी’च्या विज्ञापनातून साधूचा अवमान

हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करणार्‍यांना कठोर शिक्षा होत नसल्याने अशा घटना सातत्याने घडत असतात. या घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

जागृत हिंदूंचा रेटा !

इथे दिलेली उदाहरणे म्हणजे हिंदू जागृत झाल्यास काय घडू शकते ? याची झलकच आहे. हिंदू आता शांत न रहाता त्यांना जे जे अयोग्य वाटते त्याला निवेदन देणे, दूरभाषद्वारे निषेध नोंदवून, पत्र पाठवून, सामाजिक माध्यमांवर पोस्ट करून विरोध करत आहेत. परिणामस्वरुप, अनेकांना त्यांची विज्ञापने पालटावी लागत आहेत !