गेल्या ६ वर्षांत एकातरी भाजप नेत्याच्या घरावर इडीने धाड टाकली का ? – सचिन सावंत, प्रवक्ते, काँग्रेस

आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचं ते कार्ट.., भाजपवाल्यांकडे कोट्यवधींची संपत्ती आहे मग त्यांची चौकशी का नाही ?, असे प्रश्‍न काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केले आहेत.

मुरगाव पोर्ट ट्रस्ट बंदरात कोळसा हाताळणार्‍या १९ आस्थापनांना ‘सेस’ भरण्याविषयी गोवा सरकारची नोटीस

कोळशाची वाहतूक करणार्‍यांकडून सेस गोवा ग्रामीण विकास आणि कल्याण सेस या नावाने वसूल केला जातो.

कोरगाव, पेडणे येथून २० लाखांचे अमली पदार्थ कह्यात

८ सहस्र ६०० रुपयांचा गांजा, ५ लाख ६० सहस्र रुपयांचा चरस आणि १४ लाख रुपये किमतीची कॅनाबिस लागवड कह्यात घेण्यात आली.

हिंदुत्वनिष्ठांचे रक्षण कधी होणार ?

तमिळनाडू हिंदु महासभेचे राज्य सचिव नागराज यांची होसूर येथील आनंदनगरातील त्यांच्या घराजवळ अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी वार करत हत्या केली. काही मासांपूर्वी नागराज यांनी पोलिसांकडे संरक्षण देण्याची मागणी करूनही पोलिसांनी ती नाकारली होती.

‘अ सुटेबल बॉय’ वेब सिरीजच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार ! – मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

वेब सिरीजमध्ये मंदिरामध्ये मुसलमान प्रियकराकडून हिंदु प्रेयसीचे चुंबन घेण्याचे दृश्य आणि ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन ! वास्तविक केंद्र सरकारनेच अशा प्रकारच्या वेब सिरीजवर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे !

केरळ सरकारकडून सामाजिक माध्यमांवरून अपकीर्ती करणार्‍यांवर कारवाई करणार्‍या कायद्याच्या कार्यवाहीला स्थगिती

केरळ सरकारने काढलेल्या अध्यादेशाला मागे घेतले आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी ‘सध्या या कायद्याची कार्यवाही करण्यात येणार नाही’, असे म्हटले आहे.

बंगालमध्ये भाजप महिला नेत्याच्या वाहन ताफ्यावर आक्रमण

भाजपच्या नेत्या भारती घोष यांचा वाहनताफा तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अडवून आक्रमण केले, असा आरोप घोष यांनी केला.

वेळेत दोषारोपपत्र सादर न करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई न झाल्यास मोर्चा काढू ! – मनसेची चेतावणी

सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे

महिलांना साहाय्य करण्यासाठी गोव्यात पोलिसांची व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन

महिलांच्या साहाय्यासाठी पोलीस खात्याने १०९१ हा ‘हेल्पलाईन’ क्रमांक कार्यान्वित केला आहे.

सांताक्रूझ आणि पाळोळे येथून ५ लाख ३० सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात

सांताक्रूझ येथे टाकलेल्या धाडीत १ लाख ६२ सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले.