अवैध मद्याची वाहतूक रोखण्यासाठी विशेष पथक नेमण्याचा विशेष पोलीस महानिरीक्षकांचा आदेश

(प्रतिकात्मक चित्र)

सावंतवाडी – कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय विलासराव मोहिते यांनी येथील पोलीस ठाण्यास भेट दिली. या वेळी त्यांनी जिल्ह्यातील गुन्ह्यांविषयी माहिती घेतली, तसेच ३१ डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात होणारी अवैद्य मद्याची वाहतूक रोखण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्याचा आदेश पोलीस अधीक्षकांना दिला आहे. हे पथक अवैद्य मद्य वाहतूक कारणार्‍यांसह वाहतूक पोलीस, पोलीस तपासणी नाके यांच्यावरही लक्ष ठेवून असणार आहे. या वेळी त्यांनी जिल्ह्यातील अवैध मद्य वाहतुकीसह अन्य अवैध व्यवसायांवर आणि समाजविघातक कृत्यांवर आळा घालण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. (अवैध कृत्यांवर आळा बसवणे हे पोलीस दलाचे कामच आहे. असे असतांना वाहतूक पोलीस आणि पोलीस तपासणी नाक्यावर लक्ष ठेवण्यासाठी पुन्हा नवीन पथकाची नियुक्ती करावी लागणे म्हणजे कार्यरत असलेले पोलीस त्यांचे काम योग्य प्रकारे करत नसल्याचे स्पष्ट होते ! – संपादक)

​या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. रोहिणी सोळंके, पोलीस निरीक्षक शशिकांत खोत आदी उपस्थित होते.