मृत गाय-बैल यांचे मांस आणि कातडी बाळगणे गुन्हा नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई – मृत गायी आणि बैल यांची कातडी बाळगल्याप्रकरणी शफिकउल्ला खान या चालकावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. यावर शफिकउल्ला खान यांनी ‘मृत प्राण्यांचे कातडे बाळगण्यात काय चुकीचे आहे ?’, असा प्रश्‍न उपस्थित करत याविषयी न्यायालयात याचिका केली होती. त्यावर न्यायमूर्ती व्ही.एम्. देशपांडे आणि अनिल किशोर यांच्या खंडपिठाने मृत गाय आणि बैल यांचे मांस आणि कातडी बाळगणे हा गुन्हा नाही, असा निर्णय दिला.