राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध मद्य वाहतुकीविरोधात धडक कारवाई मोहीम

६० लाखांचा देशी आणि विदेशी मद्याचा साठा हस्तगत

नाशिक – राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य वाहतुकीविरोधात धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे. येथील सुरगाणा तालुक्यात ट्रकसह अनुमाने ६० लाखांचा देशी आणि विदेशी मद्याचा साठा हस्तगत करण्यात आला. ३१ डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य विक्रीला चाप लावण्यासाठी गुजरात, तसेच दीव-दमण सीमेवर पथके नेमली आहेत. ३१ डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या ८ दिवसांपासून आम्ही अवैध मद्य वाहतूक आणि विक्री यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी धडक मोहीम चालू केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. देशी-विदेशी मद्यासह मोठ्या प्रमाणावर दारूचे खोके जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. मनोहर अंचुळे यांनी दिली.